एमआयडीसीत कचऱ्याची समस्या

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साफसफाई व कचरा वाहतुकीसाठी महानगरपालिकेने पुरेशी व्यवस्था केलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. कचरा वाहतुकीसाठी मनुष्यबळही अपुरे असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने पुरेशी तरतूद करावी अशी मागणी उद्योजक संघटनेने केली आहे.

पालिका कार्यक्षेत्रामध्ये 876 हेक्टर जमिनीवर तळोजा एमआयडीसी उभारण्यात आली आहे. 1622 औद्योगिक भूखंड आहेत. एमआयडीसीमध्ये 42.18 किलोमीटरलांबीचे रस्ते असून, त्यामध्ये 22.54 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे आहेत. 19.64 किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरणाचे आहेत. मनुष्यबळ वाढवा साफसफाईसाठी अपुरे मनुष्यबळ व कचरा वाहतुकीसाठी पुरेशी वाहने नसल्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचीही भीती टीबीआयने व्यक्त केली आहे.

जबाबदारी कोणाची

एमआयडीसीमधील स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. पण, मनपाकडून पुरेशी व्यवस्था केली जात नसल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन अर्थात टीबीआयने निदर्शनास आणून दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष सतीश शेट्टी व इतर सदस्यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Exit mobile version