खेतान कंपनीतील सांडपाणी शेतात

| खोपोली | प्रतिनिधी |

वणी गावात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या खेतान कंपनीतील दूषित सांडपाणी शेतात पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, दगड मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने असून रंजना भोसले आणि मनोहर म्हस्के यांनी तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
खालापूर तालुक्यातील केळवली वणी गावात खेतान कंपनीचे नव्याने बांधकाम सुरू आहे. याठिकाणी कामगार राहत आहेत. येथील सांडपाणी शेजारील शेतात सोडले जात आहे. तसेच, त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच साठल्यामुळे सांडपाणी त्या ठिकाणी तुंबले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. भविष्यात कंपनी सुरू झाल्यावर केमिकल्सयुक्त सांडपाणी शेतात तुंबल्यावर संबंधित शेती नापीक होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे खेतान कंपनी विरोधात तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन नुकसानीची माहिती दिली आहे.

Exit mobile version