कृषीवल हळदीकुंकू सोहळा पहा एका क्लिकवर! सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण…

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गेली जवळपास तीन दशके अखंडितपणे सुरु असलेला कृषीवल हळदीकुंकू सोहळा यावर्षी देखील दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. अलिबागकरांच्या आग्रहाखातर या सोहळ्याचे बुधवारी (दि.18) सायंकाळी चार वाजता इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या या कार्यक्रमात उपस्थित राहता न येणार्‍या तरुणांना ऑनलाईनच्या माध्यमातून कलाकारांना पाहता येणार आहे. तरी सर्वांनी कृषीवल न्यूज हे इंन्स्टाग्राम पेजला भेट देत या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन कृषीवलच्यातर्फे करण्यात आले आहे.

अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात मराठी सिनेतारकांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी चार वाजता रंगणार आहे. 28 व्या वर्षात पदापर्ण करणारा या विक्रमी सोहळ्यात महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी प्राप्त करुन दिली आहे. या कार्यक्रमात सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘आर्शिवाद तुझा एकविरा आई’ फेम मयुरी वाघ, तसेच ‘जिवाची होतिया काहिली’ फेम प्रतिक्षा शिवणकर आणि राज हंचनाळे, श्रुतकिर्ती सावंत त्याचप्रमाणे ‘प्रतिशोध झुंज अस्तित्वाचा’ फेम पायल मेमाणेअक्षय वाघमारे आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version