|आगरदांडा | प्रतिनिधी|
मुरुड ग्रामीण रुग्णालयात इन्फ्लुएंजा फ्लु लक्षणांचे आतापर्यत कोणतेच रुग्ण नाहीत. परंतु साधारण सर्दी व ताप ही लक्षणे असलेली पाच रुग्ण रुग्णालयात असून त्यांना रुग्णालयात ठेवून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वाची आर टीपीसी आर टेस्ट करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी इन्फ्लुएंजा फ्लु लक्षणांची काळजी घेणे जरुरी आहे.
जर एखाद्या रुग्णाला डोकेदुखी, खोकला, नाक गळणे, घसादुखी, ताप लक्षणे हे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हंगामी ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाका, आपले हात नियमितपणे साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा असे आवाहन मुरुड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उषा चोले यांनी केले.