। छत्रपती संभाजीनगर । वृत्तसंस्था ।
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने एका वॉचमनला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे.
रमेश अग्रवाल हे कॉन्ट्रॅक्टर अशोक दराडे यांच्याकडे बीड हायवे रोडवरील गांधेली फाट्याजवळ रात्रपाळीत वॉचमन म्हणून काम होते. शनिवारी (दि. 20) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास रोडच्या कडेला रमेश अग्रवाल शेकोटी लावून बसले होते. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की, अग्रवाल यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर कारचालक कार सोडून घटना स्थळाहून फरार झाला. या प्रकरणी कारचालक संजय शिवाजी राठोड याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.