रोहा तालुक्यात जल अर्थसंकल्प प्रशिक्षण

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील दि.23 ते 25 दरम्यान खांबेरा, यशवंत खार आणि तळघर या गावांमध्ये जल अर्थसंकल्प विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. फाऊंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी यांच्या वतीने व त्या कंपनीचे अधिकारी वर्ग यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी जल अर्थसंकल्पाची संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली. तसेच गावपातळीवर जलखेळ आयोजित करण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे पाणी नियोजन आणि गावस्तरीय जलनियोजन याबाबत प्रत्यक्ष व उपयुक्त ज्ञान मिळाले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकूण 492 कुटुंबे आणि सुमारे 2706 लोकसंख्या लाभान्वित झाली असल्याची व हा उपक्रम गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि जलसुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याची अधिक माहिती पत्रकारांना दिली आहे.

Exit mobile version