मुरुडमध्ये पाणीप्रश्न पेटला

Exif_JPEG_420

आंबोली धरणाचे पणी नांदगाव पंचक्रोशिला देण्यास विरोध; मुरुडकरांनी रस्त्यावर उतरत राबविली सह्यांची मोहीम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

आंबोली धरणातून नांदगाव पंचक्रोशिला पाणी देण्यास मुरुडकरांनी विरोध दर्शविला असून, त्यासाठी ‌‘मी मुरुडकर’ या बॅनरखाली सर्वपक्षियांनी एकत्र येत सह्यांची मोहीम राबवली. आमच्या हक्काचं पाणी कोणालाही देणार नाही, असा पवित्रा घेत रस्त्यावर उतरलेल्या मुरुडकरांनी शासनाने आमचा विरोध असतानाही पाणी देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मुरुड शहरासह पंचक्रोशी भागासाठी पिण्याच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यासाठी अंबोली धरणाची निर्मिती झाली. हे धरण 2009 साली 29 कोटी रूपये खर्च करुन बांधण्यात आले. या मुबलक पाण्यामुळे पाण्याची समस्या मिटली होती.परंतु आता याच खारआंबोली धरणामधून नांदगाव, विहुर, मजगाव, उसरोली, आदाड व इतर गावांना पाणी देण्याचे शासनाने नक्की केले आहे. यामुळे मुरुड शहरासह आंबोली धरणाच्या परिसरातील लोकांवर अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात ‌‘मी मुरूडकर’ यांनी संपूर्ण शहरातील बाजारपेठ, रणदिवे पाखाडी, जुनी पेठ, प्रत्येक पाखाडीतून सह्यामोहीम राबवली असून नागरिकांकडून याला चांगले समर्थन देत सह्या केल्या आहेत.

यावेळी मंगेश दांडेकर, मनोज भगत, प्रमोद भायदे, कुणाल सतविडकर, आदेश दांडेकर, अजित कासार, इस्माईल शेख, अजित गुरव, उमेश भोईर, विजय भोय, बाबा दांडेकर, नाना गुरव, रूपेश धोत्रे, प्रशांत कासेकर, विजय सुर्वे, विजय पैर, आशिष दिवेकर, राजू दांडेकर आदींसह मुरुडकर उपस्थित होते.

आंबोली धरणातून मुरुड शहारांसह राजपुरी, शिघ्रे, तेलवडे, एकदरा या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणी पुरवठा केला जातो. जर शासनाने पाणी देण्याचे हट्ट केला, तर पाणी प्रश्न ऐरणीवर येणार असून, पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. आणि खड्डातून पाणी भरण्याची परंपरा चालू होईल. ही बाब अतिशय गंभीर असून या गोष्टीला आजच विरोध केला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी मुरुडकरांना झगडावे लागेल.नांदगाव पंचक्रोशी भागातील नागरिकांना पाणी देण्याचा आमचा विरोध नाही. परंतु, नादगांव पंचक्रोशी भागासाठी वांद्रे धरणाची निर्मिती होणार आहे. तरी मुरुडकरांचे हक्काचे तोंडचे पाणी पळविणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न मी मुरुडकर विचार आहे.

मंगेश दांडेकर म्हणाले की, मुरुड शहरावर पिण्याचा पाणी प्रश्न उद्भव नये यासाठी नांदगाव पंचक्रोशी भागातील गावांना आमचा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण शहरात आज पासून सह्याची मोहिम सुरू केली आहे. तर, मनोज भगत यांनी सांगितले की, मुरुडकरांनी जे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी जो त्रास भोगला आहे, तो त्रास पुन्हा आमच्या महिलेवर पुन्हा येऊ नये. त्यासाठी आताच आवाज उठविला पाहिजे, त्यासाठी आंदोलन करावा लागला तरी चालेल, पण आमचा हक्काचं पाणी कोणालाच घेऊ देणार नाही.

प्रमोद भायदे यांनी सांगितले की, मुरुडला कित्येक वर्षे पिण्याच्या पाण्याच्या समस्याने नागरिक हैराण होते. शहराला एक दिवस आड पाणी ते पण जेमतेम अर्धा तास पाणी पियाचं मिळायचं, ही समस्या दुर करण्यासाठी आम्ही आंबोली धरण व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याला यश ही मिळालं आंबोली धरणाची निर्मिती झाली आणि मुरुडला पिण्याची पाण्याची समस्या दुर झाली. आणि याच धरणातुन आमचं हक्काचं पाणी कोणीतरी बळकावतयं हे मी मुरुडकर कधी ही खपुन घेणार नाही.

Exit mobile version