ग्रामस्थांच्या बैठकांचे सत्र,सह्यांची मोहीम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदी ही उन्हाळयात कोरडी असते आणि त्यामुळे त्या भागातील गावे तसेच आदिवासी पाडे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या चिल्हार नदीला बारमाही वाहती करावी यासाठी या भागातील पाणीटंचाई ग्रस्त गावे- वाड्या यांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नदीजोड प्रकल्पसाठी स्थानिकांनी सह्यांची मोहीम हातात घेतली आहे.
कर्जत तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई हि चिल्हार नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये उन्हाळयात पाणीटंचाई असते.त्या ठिकाणी पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी गेल्या 20 वर्षांपासून चिल्हार नदी वाहती करावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावेळी केवळ चर्चा असायची मात्र मागील महिन्यापासून या भागातील पाणी टंचाईग्रस्त गावातील स्थानिक तरुणांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
बोगदा आवश्यक
नदीच्या आजूबाजूला मोग्रज,पाथरज,बोरिवली,पिंपळोली,कशेळे,टेंबरे आणि वाकस या सात ग्रामपंचायत मधील गावे आणि वाद्यांचा समावेश आहे.या पाणीटंचाई ग्रस्त भागातील मोग्रज ग्रामपंचायतच्या मागील बाजूस एक डोंगर असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या या डोंगराच्या तीन किलोमीटर परिघाच्या पुढे टाटा धरणातील पाणी आणणारे कालवे आहेत.त्या उजव्या कालव्याचे पाणी डोंगरातून बोगदा काढून चिल्हार नदीमध्ये सोडले तर चिल्हर नदी मोग्रज ग्रामपंचायत हद्दीपासून वाहती होईल.ते लक्षात घेऊन स्थानिकांनांनी आता आरपार ची लढाई करण्यासाठी लढा सुरु केला आहे.
त्यासाठी नदीलगत गावातील सर्व ग्रामस्थांच्या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचवेळी या भागातीलस पूर्व ग्रामपंचायती यांनी डोंगर फोडून बोगदा तयार करण्यात यावा आणि पाणी पुढे न्याने असा ठराव ग्रामपंचायती घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे या पथकाने आता कालव्याच्या पाण्यावर हक्क असलेला पाटबंधारे विभाग तसेच जागेची अडचण सोडविण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागाला निवेदन देण्याचा आणि हा प्रश्न सुटावा यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.मात्र चिल्हार नदी बारमाही वाहती व्हावी यासाठी आता जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी या पाणीटंचाई ग्रस्त भागातील ग्रामपंचायती तसेच गावे- वाड्या यांची महत्वाची भूमिका घेतल्याने हा प्रश्न सुटू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.