पोहण्याची मजा घेणाऱ्याच्या शरीराला खाज
| नेरळ | प्रतिनिधी |
टाटा कंपनीच्या आंध्रा धरणाचे पाणी कर्जत तालुक्यातून वाहताना उल्हास नदीमधून ठाणे जिल्ह्यात जाते. धरणाचे पाणी पेज नदीमधून आणि नंतर उल्हास नदीमधून वाहत जाते. त्यामुळे कर्जत शहराच्यामधून वाहणारी उल्हास नदीमध्ये सांडपाणी वाहत जाते आणि त्यामुळे ही नदी प्रदूषित होते. त्यांचा फटका जानेवारी महिन्यापासून बसण्यास सुरुवात होते आणि आता उल्हास नदीचे पाणी हिरवेगार बनले आहे. दरम्यान, पाण्यावर बसणारा हिरवा तवंग दिसून येऊ लागला आहे. त्यांचा परिणाम त्या पाण्याला खाज येत असून, त्या दूषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता बळावली आहे.
कर्जत येथून खऱ्या अर्थाने उल्हासनदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी उल्हास नदीत जमा झाली आहे. मागील अनेकदा या जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले आहे. परंतु, काढलेली जलपर्णी ही नदी पात्रातून काढून बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन नदी पत्रातील पाणी दूषित झाले आहे. ते सर्व हिरवेगार जलपर्णी यांचे जंगल हे सांडपाण्यामुळे तयार झाले आहे. कर्जत शहरातून काही प्रमाणात सांडपाणी हे पुढे नदीतून खाली वाहून जात असते. त्या पाण्यात दररोज जलपर्णी वाहून पुढे आंबिवली येथून बारमाही वाहत्या बनलेल्या उल्हासनदीतुन तरंगत जाताना दिसत आहे.
या जलपर्णी मे महिन्यात उल्हासनदीच्या पाण्यातून वाहत जाताना अनेकदा दिसतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून उल्हासनदीमध्ये जलपर्णी या जानेवारी महिन्यापासून पाण्यात वाहत जाताना दिसत आहेत. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या अर्धा कर्जत तालुका आणि पुढे ठाणे जिल्ह्यातील कल्याणपर्यंतचा भाग या पाण्यावर अवलंबून आहे. सर्व लोक पिण्याचे पाणी वापरतात. हे दूषित हिरवेगार पाणी पाहून सर्व घाबरले आहेत. कारण नदीचे पाणी केवळ गढूळ बनले नाही तर त्या पाण्याला चिकटपणा देखील आला असून, दुसरीकडे वाहत्या नदीमध्ये पोहण्याची मजा घेणारे यांच्या शरीरावर खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणारे यांची संख्या कमी झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ही समस्या केवळ कर्जत शहरातील सांडपाणी उल्हासनदीमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही. तर गेल्या काही वर्षात सातत्याने नागरीकरण झालेल्या नेरळ शहर वजा गावातून असलेल्या रहिवाशी भागातील सांडपाणी देखील माथेरानच्या डोंगरातून पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सोडले आहे. तो नाला पुढे उल्हासनदीला जाऊन मिळतो.
त्यामुळे कर्जत नंतर उल्हासनदीमध्ये नदीचे पाणी प्रदूषित करणारे जलपर्णी यांचे उगम हे नेरळ गावातून देखील झाले आहे. सांडपाणी येथे उल्हासनदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णी यांच्या संख्येने वाढ होते. ही समस्या केवळ सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचे सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राच्या नदीचे पाणी मुंबई येथे परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
नदी प्रदूषित झाल्याने भीती
मात्र सध्या पाण्यात दिसणाऱ्या हिरव्या तवंगामुळे पाण्यात उतरण्याची हिम्मत सर्वसामान्य लोक करीत नाही. त्यांचे कारण म्हणजे त्या हिरव्या पाण्याला चिकटपणा असून त्याचा परिणाम अंगावर खाज येण्यास होत असतो. हिरवेगार तवंग बघून उल्हास नदी प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष निघत आहे. त्याचवेळी परिवाराण प्रेमी आणि उल्हस नदी जल संवर्धन समितीकडून देखील या तवंग याबाबत विचारविनिमय सुरु झाला आहे.






