| पनवेल | प्रतिनिधी |
यंदाच्या पावसामध्ये सिडकोच्या ढिसाळ कारभाराचा फटका नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे चिंचपाडा परस्टाईल नागरिकांना बसला असून, यासंदर्भात जनहित सामाजिक संस्थेचे सचिन केणी यांनी संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात त्यांनी मार्च महिन्यातच सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून येथील समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी करंजाडे सेक्टर 1 व 2 येथील मोठ्या नाल्यामधून मधून पावसाळी पाण्याचे निचरा सुरळीतपणे होत नसल्याने सदर ओढ्याचे काम तात्काळ सुरू करावे, त्याचप्रमाणे इतरही विभागाची पाहणी करून ओढ्यामधील पाणी बाहेर काढून त्याची लेव्हल करावी, अशी मागणी केली होती. परंतु, या कामाकडे सिडकोने अजूनही गांभीर्याने न पाहिल्याबद्दल येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे करंजाडे चिंचपाडा परिसरात पाणी साचले आहे.
रस्त्यांवर पाणी, सिडकोविरोधात संताप
