पुलावरुन गेले पाणी; प्रवासी पडले अडकून

अंबा नदी पुलावरून तिसर्‍यांदा गेले पाणी
। सुधागड-पाली । गौसखान पठाण ।
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावरुन बुधवारी (ता.21) पाणी गेले. त्याआधी मंगळवारी (ता.20) पाणी गेले होते. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजुस अडकून पडले होते.

गुरुवारी (ता.22) सकाळी साडेसातनंतर पाली अंबा नदी पुलावरून व 12 नंतर जांभूळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास वारंवार प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते.

पाली व जांभुळपाडा अंबा नदीवरील पुल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वाची भुमिका बजावतात. मुसळधार पाऊस असल्याने पाली अंबा नदी पुलावरून पाणी गेले. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.

दिलीप रायण्णावार, तहसिलदार, पाली-सुधागड

Exit mobile version