खाडीकिनारी जलप्रदूषण वाढले

मासेमारी करणार्‍यांना फटका

। उरण । वार्ताहर ।

उरण-पनवेलच्या विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे. तर, दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भरावामुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणार्‍या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणार्‍या व्यवसायिकांवय उपासमारीची वेळ आली आहे.

जेएनपीए बंदर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उरण पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात काही भांडवलदारांनी आपला व्यवसाय उरण-पनवेल खाडीकिनार्‍यालगत असलेल्या शेतजमिनीवर सुरू केला आहे. अशा खाडीकिनार्‍यावरील शेतजमिनीवर दगड मातीचा भराव टाकला जात असून त्या भरावात खारफुटीचे जंगल वाढणारे पाणलोट क्षेत्रही भूजविले जात आहे. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भरावामुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणार्‍या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसत आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणार्‍या व्यवसायिकांवय उपासमारीची वेळ आली आहे. तरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी किसन जावळे, मत्स्य विभागाचे अधिकारी यांनी या बाबींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी पारंपरिक मासेमारी करणारे व्यावसायिक करत आहेत.

Exit mobile version