गणेशोत्सव काळात दोनदा पाणीपुरवठा करावा

। मुरुड । वार्ताहर ।

कोकणातील महत्वाचा सण अर्थात गणेशोत्सव. चाकरमानी सहकुटुंब सहपरिवार लाडक्या बाप्पाच्या आगमनापासून गणेश चतुर्थीपर्यंत मूळ गावी येऊन आनंदाने उत्सव साजरा करतात. परिणामी सद्यः स्थितीत मुरुड नगरपरिषदेकडून केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला आहे. त्यातून गावी आलेल्या कुटुंबातील व्यक्तिंची संख्या वाढल्यामुळे होणारा पाणी पुरवठा कमी पडून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता पाणीपुरवठा खात्याने 6 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत दोन वेळा मुरुड शहरात पाणीपुरवठा करावा. जेणे करून नागरिकांना सकाळ व संध्याकाळ दोन वेळा पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल. मुख्याधिकार्‍यांनी पाणी पुरवठा विभागाकडून योग्य नियोजन करून कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेच्यावतीने माजी पाणीपुरवठा सभापती पी के आरेकर यांनी निवेदनामार्फत केली आहे.

Exit mobile version