| अलिबाग | प्रतिनिधी |
सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांना होणारा पाणी पुरवठा बुधवार, (दि.22) सकाळी 9.00 वाजल्यापासून ते गुरुवार, (दि.23) सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.