। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार दि.10 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, त्यानंतर पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे प्रभावित परिसरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. त्याचबरोबर या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.