शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद

विहिरीवरील पंपाची केबल चोरीला
| तळा | वार्ताहर |
टोकार्डे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या भारत निर्माण योजनेची विहिरीवरील पंपला जाणारी इलेक्ट्रिक केबल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामुळे शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. जवळपास 140 मीटर लांबीची ही केबल असून, याची किंमत साधारण 28,000 रुपये इतकी आहे.

टोकार्डे गावात याआधीदेखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. 2011-12 दरम्यान टोकार्डे गावातील देवळात असलेली घंटादेखील चोरीला गेली होती. त्यानंतर 2015 साली घरफोडीची घटना घडली होती. या घरफोडीदरम्यान चोरट्यांनी आठ ते नऊ घरे फोडली होती. त्यातील चार घरांतील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

आता पुन्हा टोकार्डे गावातील भारत निर्माण योजनेंतर्गत असलेल्या पाणी योजनेची वायर चोरीला गेल्याने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ही योजना 2007-08 साली पूर्ण होऊन या योजनेतून जवळपास गावातील 180 घरांना पाणीपुरवठा होतो. ही वायर चोरीला गेल्याने गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर याचा तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version