। नेरळ । वार्ताहर ।
प्रायव्हेट साईटवरून 39 हजार पाचशे पन्नास रूपयांचा माल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा.कमला रेसिडेन्सी, खोपोली यांच्या खाड्याचापाडा येथील एक्झर्बिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या साईटवरुन, एल.ई.डी.हॅलोजन, इलेक्ट्रीक केबल, 63 अॅम्पीअर क्षमतेचे एम.सी.बी. व ते ठेवण्याकरीता बसविलेला बॉक्स असा एकूण 39 हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.