। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमधील रोख रक्कम चोरणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर हॉस्पिटलमधील एमआरआय विभागात असलेले 51 हजार रुपये आरोपी रोहित अनिल भोसले (25) रा.सुकापूर याने लबाडीने चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.परेश पाटील, जयराम बांगर आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा वाजे गावात लपून बसल्याचे दिसल्याने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास पो.हवा.जयराम बांगर करीत आहेत.







