। पनवेल । प्रतिनिधी ।
एकाला ई-मेल आला आणि दुसर्याला आला नाही यावरून हुज्जत घालून लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी आरोपी खाजा चांद शेख रा. सेक्टर 8 कळंबोली याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीराम हरी मुंडे हे तळोजा एमआयडीसी येथे गाडी भरण्यासाठी कंपनीच्या गेटवर जाऊन कंपनीच्या ई-मेलची वाट पाहत होते. यावेळी श्रीराम यांच्या ओळखीचे खाजा चांद शेख (25) हे गाडी भरण्यासाठी त्या ठिकाणी हजर असताना श्रीराम यांना ई-मेल आला आणि आरोपीला ई-मेल आला नाही यावरून आरोपी याने श्रीराम यांच्यासोबत हूज्जत घातली आणि त्याच्या तीन मित्रांना बोलावून आरोपी याने श्रीराम यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.






