सोमवारी तालुक्यात पाणीबाणी

दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकर पाडा येथील जलशुद्धी केंद्रातील पंप आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोमवारी (दि.8) हाती घेण्यात येणार आहे. याकरिता जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमजीपीच्या या निर्णयाचा परिणाम तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर होणार असल्याने तालुक्यात सोमवारी पाणीबाणीची परस्थिती निर्माण होणार आहे.

पातळगंगा नदीतील पाणी शुद्ध करून त्याचा तालुक्यातील ग्रामीण भागासोबतच शहरी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमजेपीकडून भोकर पाडा येथे जल शुद्धीकरण केंद्र चालवण्यात येत आहे. या केंद्रातून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा पनवेल पालिका हद्दीतील कळंबोली, कामोठे, खारघर, नवी मुबंई तसेच सिडकोच्या इतर वसाहतीसोबतच तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या कारंजाडे, डेरवली, विचुंबे, पारगाव तसेच इतर ग्रामीण भागाला केला जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार दुरुस्तीच्या कामाकरिता पाणीपुरवठा सोमवारी (दि.10) सकाळी 9 वाजेपासून दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.11) सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारीदेखील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून, गुरवार (दि.13) पर्यंत कमी आणि अनियमितपणाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपवय न करता पाण्याचा वापर योग्य रितीने करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. पनवेल पालिका हद्दीतील जुन्या नगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो. मात्र, देहरंग धरणातून होणार्‍या या पाण्यातून संपूर्ण शहराच्या पाण्याची गरज भागवली जाऊ शकत नसल्याने पाण्याची ही गरज भगवण्यासाठी एमजेपी आणि एमआईडीसीकडून होणार्‍या पाण्यातून शहरवासियांची गरज भागवण्यात येत असते.

Exit mobile version