रासळवाडी कबड्डी स्पर्धेत वावे विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

जय भवानी बाल विकास क्रीडा मंडळ रासळवाडी यांच्या विद्यमाने सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 14 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ श्री भैरिनाथ वावे हा संघ ठरला. या संघास रोख 11 हजार रु व चषक, तर उपविजेतापदाचा मानकरी स्वयंभू हनुमान चिवे या संघास रोख 7 हजार रु व चषक, तृतीय क्रमांक भैरवनाथ नागशेत संघास रोख 5 हजार रु व चषक, चतुर्थ क्रमांक ओम कालभैरव आपटवणे या संघास रोख 5 हजार रु व चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वप्नील भिलारे (चिवे), उत्कृष्ट चढाई राज बेलोसे (नागशेत), उत्कृष्ट पक्कड जयेश खाडे (वावे), पब्लिक हिरो सुमित मोरे या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version