आम्ही पिरकोनकर समूहाद्वारे रक्तदान शिबीर

। उरण । वार्ताहर ।
आम्ही पिरकोनकर समूहाद्वारे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी 5 मे रोजी पंचरत्न इंग्लिश मेडीअम स्कूल, पिरकोन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी मिशन वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रक्त केंद्र कामोठे यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. 56 पुरूष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना समूहाच्यावतीने प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी मोहन कोंगेरे ,अनंत गावंड,मंगेश म्हात्रे ,रमाकांत गावंड, विनायक गावंड जीवन गावंड आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जितेंद्र पाटील, संकेत पाटील, अजित म्हात्रे या शरीरसौष्ठवपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पिरकोन गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक मंगल गावंड यांनाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरास साई संस्थान वहाळचे प्रमुख रविशेठ पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले. सोमनाथ गावंड, परिसरातील अनेक मान्यवरांनी या सामाजिक व आत्यंतिक गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर यांनी केले. शिबिराचे यशस्वी आयोजन होण्यासाठी आम्ही पिरकोनकर समूहाचे चेतन गावंड, तुषार म्हात्रे, मनोहर पाटील, प्रमोद पाटील, विनय गावंड, सुरेंद्र गावंड, प्रणित गावंड, सिद्धेश गावंड व एम.जी.एम. रुग्णालय स्टाफने मेहनत घेतली

Exit mobile version