आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे तेजोमय प्रदर्शन आणि विक्री

| अलिबाग | प्रतिनिधी |

दिवाळी सणाचे औचित्य साधत आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे तेजोमय हे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. दि.15,16 ऑक्टोबर दरम्यान भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात ड्रेस मटेरिअल, साड्या, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स गृहोपयोगी वस्तू, दिवाळी सणासाठी लागणार्‍या विविध वस्तुंचे स्टॉल्स सुरु करण्यात येणार आहेत.

या तेजोमय प्रदर्शनाचा प्रारंभ सकाळी 10 वाजता अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शनिवारी 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता कराओके सिंगींग स्टार हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी 16 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता पूजा थाळी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी आशा बोराडे -7718890262, अनुजा वर्तक -9923834353, कविता पाटील -9271006900 तसेच पूजा काठे -8007066888 येथे संपर्क साधावा. या प्रदर्शनासाठी स्टॉल्स बुकींग सुरु आहेत.

Exit mobile version