। मुंबई । प्रतिनिधी ।
विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे अन्य आमदारांसह संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने राजकिय वर्तूळात भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला असल्याचे विरोधकांडून सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होते. त्यामुळे शिवसेनेला चांगलाच घाम फुटला होता. अशातच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगून शिवसेनेला दिलासा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जवळपास अडीच ते तीनच्या सुमारास फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून ते नेटवर्क क्षेत्रात असल्याची झलक दाखविली. यामध्ये त्यांनी सांगितले कि, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळेसाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे म्हटले आहे.