। गुवाहाटी । वृत्तसंस्था ।
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. बंडखोरचं मंत्रीपद आता धोक्यात आलं असून ते जाण्याचीही शक्यता आहे. असे संकेत संजय राऊतांनी दिले आहेत. या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे गटातील गुवाहाटी येथे बैठक झाली. त्यानंतर आ. दीपक केसरकर यांनी त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज आहे. आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच सदस्य आहोत.
आ. दीपक केसरकर