। म्हसळा । वार्ताहर ।
कल्याण मटका जुगार चालविणार्या आरोपीला रायगड जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बुधवारी सायंकाळी फिर्यादी अलिबाग गुन्हे शाखेचे पो.ना. अक्षय तुकाराम जाधव यांनी स्थानिक पोलीस सूर्यकांत जाधव, विजय फोफसे यांच्या सहकार्याने आरोपीला रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी आरोपी इजाजद रशीद गावकर (35, रा. साळी आळी, म्हसळा) या आरोपीला अटक केली आहे. म्हसळा बायपास परिसरातील स्टार धाब्याच्या परिसरात नव्याने कल्याण मटका बुकी तयार झाल्याची खबर जिल्हा गुन्हे शाखेकडे आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 860 रुपयांची रोकड, एक वही आणि पेन असा ऐवज जप्त करण्यात आला.