न्यायासाठी सत्तेत जावे लागणार – मनोज जरांगे

| बीड । प्रतिनिधी |

आपल आंदोलन मोडण्याची कोणाचीही ताकद नाही. आंदोलन हा संविधानाने दिलेला एक हक्क आहे. काहीजण राजकीय हितापोटी जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या. जातीय तेढ निर्माण होऊ नये, असे आवाहन सर्व मराठा बांधवांना करतो. त्यांच काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाया पडले. मात्र, शेवटी एक पर्याय आहे. अन्याय बंद करायचा असेल आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे. असे मोठं विधान मनोज जरांगे यांनी केले. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आम्ही कधीच म्हणणार नाही की एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका. असे विचार आम्ही ठेवणार नाहीत. जातीय तेढ निर्माण व्हायला काय झाले? 13 तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते. 13 तारीख संपली की मराठे वाईट झाले. निवडणुकीत मराठ्यांनी तुमचं काम केले नाही का? मराठ्यांनो मी तुम्हाला हात जोडून सांगतो, शांत राहा. आपण फक्त पाहायचं कोण काय करतंय. एक महिनाभर चुका करूद्या, असे मनोज जरांगे म्हणाले. ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण नाव घेऊन त्यांना पाडल्याशिवाय सोडायचं नाही, असे म्हणत 4 जूनच्या उपोषणावर आपण शंभर टक्के ठाम आहोत. माझ्या समाजाच्या न्यायाचा विषय असून राज्य सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दाला आज पाच महिने होऊन गेले आहेत. मग राज्य सरकारला अजून किती दिवस पाहिजेत?,असे ही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version