किती घोरताय तुम्ही, 70 टक्के जोडप्यांना होतो त्रास
| मुंबई | प्रतिनिधी |
भारतातील 70 टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे 32 टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे असल्याचे सांगतात. भारतीय झोपेच्या गुणवत्तेला किती महत्त्व देतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
सर्वेक्षणातील 67 टक्के प्रतिसादकांना वाटते की, दिवसभरातील कामाच्या थकव्यामुळे जोडीदार घोरतात आणि त्याचा आरोग्य व झोपेच्या दर्जाशी काही संबंध आहे. तसेच जवळपास 45 टक्के व्यक्तींनी घोरण्यासाठी लठ्ठपणाला कारणीभूत मानले. इतर काही घटक देखील होते, जसे बहुतांश व्यक्तींचा (जवळपास 55 टक्के) विश्वास आहे की सभोवतालची परिस्थिती न बदलता घोरण्याला सोप्या उपायांनी हाताळले जाऊ शकते. भारतीयांनी त्यांची जीवनशैली आणि झोपण्याच्या सवयी बदलण्यासाठी परस्पर चर्चेद्वारे झोपेच्या गुणवत्तेचे महत्त्व कसे पाहण्यास सुरुवात केली आहे, हे अनेक घटकांनी दाखवले. उदाहरणार्थ, 36 टक्के व्यक्तींनी शांत झोपेसाठी योग्य मॅट्रेस आणि उशी असण्याचे महत्त्व मान्य केले. तसेच, 71 टक्के व्यक्तींनी त्यांच्या भागीदारांसोबत घोरण्याच्या समस्येबद्दल बोलण्यास सहमती दाखवली.
सेन्चुरी मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक उत्तम मलानी म्हणाले, सर्वेक्षणाच्या निष्पत्ती व्यक्तींना घोरण्यासारख्या झोपेसंबंधित समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास जागरूक करतात, कारण त्यांचा आरोग्य व परस्पर संबंधावर परिणाम होऊ शकतो. अपुरी झोप आणि त्याचा आरोग्य व परस्पर संबंधावर होणार्या परिणामाकडे दुर्लक्ष केले जाते, ज्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. जागतिक निद्रा दिनानिमित्त या सर्वेक्षणाद्वारे व्यक्तींची झोपमोड करणार्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही व्यक्तींना झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड मॅट्रेस व उशांसह उत्तम झोप देणारी उत्पादने देऊन चांगली झोप घेण्यास मदत करत आहोत.
बेंगळुरूमधील नोज अॅण्ड सायनस सर्जन डॉ. जगदीश चतुर्वेदी म्हणाले, सर्वेक्षणामधून स्पष्टपणे दिसून येते की, अधिकाधिक व्यक्तींना घोरण्यासारख्या त्यांच्या झोपेसंबंधित समस्यांबाबत माहित आहे आणि त्याचा स्वीकार देखील करत आहेत. व्यक्तींनी वैद्यकीय उपचार, अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड व मॅट्रेसेससह उत्तम झोप देणारी उत्पादने अशा हस्तक्षेपांसह झोपेचा दर्जा सुधारत या समस्येच्या निराकरणास सुरूवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. दीर्घकाळापर्यंत घोरण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास आरोग्यावर इतर परिणाम होऊ शकतात.
हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, पटणा आणि गुवाहाटी येथील 27 ते 50 वर्ष वयोगटातील 2700हून अधिक प्रतिसादकांमध्ये करण्यात आले.