| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेकापने तालुक्यात संघटन मजबूत केले आहे. आज धनशक्तीचा प्रचंड वापर होत असला, तरी जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर ती टिकणार नाही. सानिका घरत या उमेदवारीतून शेकापने योग्य निर्णय घेतला असून, या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळेल, असा विश्वास शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला. तसेच, शेतकरी कामगार पक्षाला तालुक्यात एक वर्षापूर्वी आव्हान निर्माण झाले होते. शेकाप तालुका चिटणीस म्हणून सुरेश घरत यांच्यावर एक जबाबदारी सोपविली. त्यांनी एका वर्षात तो विश्वास सार्थक केला. वेगवेगळ्या समित्या गठीत करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैत्यन निर्माण केले. सध्या धनशक्तीचा प्रचंड वापर केला जात आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. शेकाप हा एक मजबूत फळी निर्माण करणारा पक्ष आहे. जिल्हा परिषद थळ मतदार संघासाठी सानिका सुरेश घरत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एक चांगला उमेदवार पक्षाने दिल्याचे प्रदीप नाईक म्हणाले.
निवडणुकीत चांगले यश येणारः प्रदीप नाईक
