| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांचे संघटन मजबूत आहे. अन्यायाविरोधात लढा देण्याचे काम महिला सक्षमपणे करीत आहेत. सध्या सत्तेची दारे बंद आहेत. मात्र, आगामी काळात ती उघडणार आहेत. प्रत्येक ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष लढत राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा संघर्षाचा आहे. तोच वारसा घेऊन शेकापचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वेगवेगळ्या प्रश्नांवर लढा देत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने अलिबागसह संपुर्ण जिल्ह्यात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन केले. वाढीव बिलाविरोधात आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारण्याचे काम केले आहे. आगामी काळात या प्रश्नाबाबत राज्य पातळीवर लढा देऊन स्मार्ट मीटरची होळी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, शेतकरी कामगार पक्षाचा जाज्वल इतिहास आहे. तो पुढे नेण्याचे काम महिला करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जाज्वल इतिहास पुढे नेणार – ॲड. मानसी म्हात्रे
