भिवगड किल्ल्यावर शस्त्र पूजन आणि मिरवणूक

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीत असलेल्या भिवगड किल्ल्यावर स्थानिक तरुणांनी मिरवणुकीने जावून शस्त्रपूजन आणि सिमोउल्लांघन केले आणि परपरेनुसार भगवा झेंडा फडकावला. भिवगड हा शिवकालीन किल्ला असून या किल्ल्याचे संवधन करण्यासाठी गेली दहा वर्षे भिवगड किल्ला अखंड संवर्धन सेवा समिती कडून संवर्धनाचे काम सुरू आहे. या किल्ल्यावर शिवकाळ पासून सुरू असलेले अनेक पारंपरिक कार्यक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून सुरू होता. आता भिवगड किल्ला संवर्धन सेवा समिती कडून अनेक कार्यक्रम राबवले जात असून यात्रा आणि सण साजरे करताना मोठी गर्दी त्यानिमित्त गोळा होत असते.

दसरा निमित्त अनेक वर्षे सुरू असलेली शस्त्र पूजनाची प्रथा पारंपरिक पध्यतीने सुरू ठेवण्यात आली असून सिमोलंघन आणि शस्त्र पूजन करण्यासाठीं गावातून मिरवणूक निघाली. त्यासाठी स्थानिक आणि परिसरातील असंख्य तरुण हे मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवकाळात ज्याप्रमाणे शस्त्रपूजन आणि सिमोलंघन करण्यासाठीं निघालेल्या मिरवणुकीचे ओक्षण केले जायचे,त्याप्रमाणे स्थानिक गावकरी मिरवणुकीने नेण्यात येणार्‍या शस्त्रांचे करीत होते.डोंगर पार करून भिवगड संवर्धन सेवा समितीचे कार्यकर्ते किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला.

त्यानंतर किल्ल्यावरील शस्त्रपूजन करण्याची जागा स्वच्छ करण्यात आली आणि नंतर विधिवत शस्त्र पूजन करण्यात आले.त्यावेळी शिव आरती घेण्यात आली आणि नंतर किल्ल्यावर आसमंतातून नजरेस पडत असलेल्या ठिकाणी भव्य भगवा ध्वज विधिवत चढविण्यात आला तसेच जुना ध्वज काढून तो परत खाली पायथ्याशी आणण्यात आला.या शस्त्रपूजन मोहिमेत दुर्ग जागर रायगड तसेच ठाणे येथील तरुण सदस्य,तसेच स्थानिक दुर्ग सेवक उपस्थित होते.ध्वज फडकवल्या नंतर सर्व तेथील माळावर जमले आणि त्यांनी सोने लुटण्याचा कार्यक्रम पारंपरिक पध्यातिने सिमोउलांघन करून केले आणि त्यानंतर सर्वांनी प्रत्येकाला सोने वाटून विजयादशमी निमित्त शुभेच्छ दिल्या.किल्ले भिवगड येथे गेली अनेक वर्षे ही प्रथा किल्ला संवर्धन सेवा समितीकडून जपली जात आहे.

Exit mobile version