नागांव बंदर येथे अवतरल्या मराठी तारका; लगीनगीताचे शुटिंग उत्साहात

। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोरोनाचा कहर संपतो ना संपतोय या संभ्रमात असताना लग्नकार्य मात्र काही थांबले नाही. प्रथेप्रमाणे देवदिवाळी झाली की लग्न कार्यास सुरुवात केली जाते. यात महत्त्वाची भूमिका लग्नगीतांची असते. असच एक धूमधडाक्यात आपल्याला थिरकायला लावणारं लगीनगीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

लग्न गीतांची लग्न कार्यात मज्जाच वेगळी असते. नाचायला, reels बनवायला लग्न गीतांची रेलचेल असतेच. ‘कोलीवार्‍याची रानी’ गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर V SQUAD FILMS and EVENETS प्रस्तुत लग्नाच्या सीझनमध्ये ही नाचायला लावणारं, अतुल भालचंद्र जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं तसेच संकेत मेस्त्री यांच्या सुंदर लेखणीतून उभारलेले, शारंग जयस्वाल यांनी संगीत संयोजन केलेलं धमाकेदार लगीन गीत लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत.

या गाण्याचं चित्रीकरण नुकतंच नागाव, अलिबाग येथे पार पडले.या गाण्याचे दिग्दर्शन विनोद तांबे यांनी केले आहे. या गाण्यात प्रमुख भूमिका ‘रंग माझा वेगळा’ फेम विदिशा म्हसकर (Vidisha Mhaskar) आणि सागर खाडे यांनी साकारली आहे. तसेच सहदिग्दर्शन प्रशांत जावळे, छायाचित्रण सुयश आचाय, वेशभुषा श्रुती गायकवाड, सहकलाकार म्हणून प्रियंका दानवले आणि प्रसाद विचारे यांनी भूमिका केल्या आहेत. मेकअप मृणाली कांबळे आणि रश्मी पाटील यांनी केला आहे. या गाण्याला अतुल भालचंद्र जोशी आणि अबोली गिर्हे यांनी आपला आवाज दिला आहे.

Exit mobile version