। नवीन पनवेल । वार्ताहर ।
14 वर्षीय मुलीसोबत बेकायदेशीर लग्न करून, तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी अमोल मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील एका गावात 14 वर्षे दहा महिने वयोगटातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत अमोल पवार याने बेकायदेशीर लग्न केले व तिला गर्भवती केले. याप्रकरणी कामोठे येथील डॉक्टरांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध बलात्कारासह पॉक्सोअंतर्गमत गुन्हा दाखल केला आहे. तसेच नेमके हे लग्न कधी आणि कोणाच्या परवानगीने करण्यात आले? तसेच यामध्ये कुटुंबियांचा काही हस्तपेक्ष आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.