पोलादपूरात ढाल तलवार चिन्हाचे स्वागत

| पोलादपूर । वार्ताहर ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल व दोन तलवारी असे निवडणूक चिन्ह मिळाल्याचा आनंद आ. भरत गोगावले यांनी पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या निवडणूक चिन्हाची माहिती जलदगतीने मतदार जनतेला करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आ. गोगावले यांनी सांगितले.

Exit mobile version