। आगरदांडा । वार्ताहर।
मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कोर्लईच्या सरपंचपदी ठाकरे गटाच्या राजश्री प्रशांत मिसाळ या विजयी झाल्या.
राजश्री मिसाळ यांना 823 मते मिळाली. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेचे सरपंच उमेदवार दिपाली म्हात्रे यांचा 172 मतांनी पराभव करण्यात आला. या विजयाने आ.महेंद्र दळवी गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रचाराच्यावेळी कोर्लईतील मतदारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने दळवी यांना माघारी फिरावे लागले होते.
दरम्यान, यावेळी तेलवडे ग्रामपंचायत ग्रामस्थांनी निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना गटाला जाहीर पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
मंगळवारी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी -रोहन शिंदे यांच्या उपस्थित मुरुड तहसीलदार कार्यालया समोरील दरबार हॉलमध्ये मध्ये मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.प्रथम टपाली मतदानाला मोजणी करण्यात आली.या मोजणीत कोर्लई ग्रामपंचायत मधील सरपंच पदाकरीता राजश्री मिसाळ यांना 5 मत मिळाली व दिपाली म्हात्रे यांना 2 मते मिळाली तर काकळघर सरपंच पदाकरीता मनोहर ठाकुर 1 मतदान ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता मंगेश जोडत, निलम ठाकुर,पुष्पा मेहेतर यांना एक एक मत प्राप्त झालं.
मतदान मोजणीमध्ये वावडुंगी ग्रामपंचायतमधून बाळासाहेबांची शिवसेनेचे सरपंच उमेदवार- ऋतुजा वरणकर या विजयी झाल्या. वेळास्तेमध्येही बाळासाहेबांची शिवसेनेचे सरपंच उमेदवार शनिता खेडेकर 453 विजयी झाल्या. काकळघरमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे उमेदवार स्वस्तिक ठाकूर विजयी झाले.
या पाच ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाच पैकी चार ग्रामपंचायत निवडणुक आणण्यात यश आलं तर 1 ग्रामपंचायत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला यश मिळाले. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेस पक्ष कुठे ही दिसून आले नाही. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी, नायब तहसीलदार रविंद्र सानप, गोविंद कोटंबे, प्रसाद माळी, निवडणूक निर्णय अधिकारी साहिल मुजावर, मनोज पुलेकर, राकेश पाटील, प्रकाश आरेकर,सचिन मुनेश्वर, आशिष मुकणे आदिंसह अधिकारी यांनी काम पाहिलं. मतमोजणी केंद्रा बाहेर मुरुड पोलिस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त तैनात होता.