। सुधागड। वार्ताहर ।
१८ डिसेंबर ला पार पडलेल्या रायगडातील ग्रामपंच्यात निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. आज ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी आपटवणे, अडुळसे, आतोणे, चंदरगाव, माणगाव बु., सिध्देश्वर बु. ६ या ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता आली आहे.
आपटवणे ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी बैकर अस्मिता नरेश (शेकाप राष्ट्रवादी युती) या ५३८ मतांनी निवडून आल्या आहेत तर वालगुडे रुपाली दिनेश (अपक्ष ) यांचा ४१४ मतांनी प्रराभव झाला आहे.
चंदरगाव ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी सखाराम पांडू मरकड हे ३२५ मतांनी निवडून आले आहेत व मंगल्या वाली दोरे(अपक्ष ) यांचा २५६ मतांनी प्रराभव झाला आहे.
अडुळसे ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी वारगुडे यमुना यशवंत या ७४१ मतांनी निवडून आल्या आहेत तर हांबिर तुळसा पांडुरंग (अपक्ष) यांचा ४३१ मतांनी प्रराभव झाला आहे.
आतोणे ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी हीलम ठकी सिताराम या ३८७ मतांनी निवडून आल्या आहेत तर वाघमारे लक्ष्मी गणपत (अपक्ष) यांचा ३३४ मतांनी प्रराभव झाला आहे.
माणगाव बु. ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी साळुंके रमेश गणपत हे ९७२ मतांनी निवडून आले आहेत तर कांबळे अशोक शंकर (अपक्ष) हे ८६६ मतांनी प्रराभव झाले आहेत.
सिध्देश्वर बु. ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी पवार अशिका कैलास या ७१२ मतांनी निवडून आल्या आहेत तर वाघमारे कामिनी कृष्णा (अपक्ष) या ४७२ मतांनी प्रराभव झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त काही वेळात…..