खोपोलीत ढोल ताशाच्या गजरात शक्ती कायद्याचे स्वागत

| खोपोली | प्रतिनिधी |
महिला व बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी विधानसभेत शक्ती कायदा एकमतानं मंजूर करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन सर्वत्र होत असतानाच खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ढोल ताशाच्या गजरात,एकमेकांना पेढे भरवून स्वागत केले आहे. नगराध्यक्षा सुमन औसरमल आणि शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांची झिम्मा फुगडी ठरली आकर्षण ठरली असून महाविद्यालयातील तरूणींनीही लेझीम खेळत आनंदोत्सव साजरा केला. खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर शक्ती कायदा एकमतानं मंजूर केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्या हस्ते आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा र् सुर्वे,नगरसेविका केविना गायकवाड, शहर उपाध्यक्ष जयश्री डोंगरे,अंजू सरकार,वैशाली भोसले,अश्‍विनी ढोळे,उषा गायकवाड, तेजेस्विनी कोळी,रेखा जाधव,प्रतिक्षा नाईक,गजला खान,प्रियंका मोरे,प्रज्ञा महाडिक, भारती भिसे,संचिता भुवर,दिपा भोसले,वृक्षाली कांबळे,उर्मिला गायकवाड, धनश्री कांबळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या,अबालवृध्द,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांवर होणार्‍या अत्याचाराल आळा घाळण्यासाठी शक्ती कायदा आणण्यासाठीचा दिलेला शब्द महाविकास आघाडी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्यासह आघाडी सरकारचे आभार शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे व्यक्त केले आहे.

Exit mobile version