। खोपोली । प्रतिनिधी ।
कोमसाप खोपोली शाखेच्या वतीने रायगड भूषण एल.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरणहून निघालेल्या साहित्यिक वारकरी दिंडीचे शनिवारी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात स्वागत करण्यात आले.
अध्यक्षा उज्ज्वला दिघे, कोषाध्यक्ष वामनराव दिघे, उपाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, कार्याध्यक्ष नरेंद्र हर्डीकर यांनी दिंडीचे स्वागत केले. प.पू. गगनगिरी महाराजांच्या मठातर्फेही दिंडीचे स्वागत केले गेले. त्यानंतर भक्तीपर अभंगगाणी सादर केली गेली. श्री. होळकर, मच्छिंद्र म्हात्रे, एल.बी. पाटील यांनी भजने सादर केली. खोपोली कोमसापच्या वतीने नरेंद्र हर्डीकर, प्रकाश राजोपाध्ये, डॉ. सुभाष कटकदौंड, संतोष वाघ, प्रकाश सोनवणे, रेखा कोरे, उज्ज्वला दिघे, जयश्री पोळ, श्री. सताणे यांनी काव्यपुष्पे सादर केली. हा कार्यक्रम संपन्न करून दिंडी पंढरीला मार्गस्थ झाली.