खालापूर टोल नाक्यावर शरद पवारांचे स्वागत

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरद पवार यांचं एक्सप्रेसवेरील खालापूर टोल नाक्यावर जंगी स्वागत करण्यात आले. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचे दर्शन घेत मुंबईला जात असताना स्वागत केले. यावेळी पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है घोषाणा देण्यात आल्या. खोपोली शहर आपल्या सोबत असल्याचे अश्वासन ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकरांनी पवार यांना दिले.

यावेळी खोपोली शहर अध्यक्ष मनेष यादव, युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, विद्यार्थी संघटना शहर अध्यक्ष बिपीन पवार, सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष अमित पवार, माजी नगरसेविका वैशाली जाधव, केविना गायकवाड, विनायक तेलवणे, विनोद रजपूत, सचिन पवार, सोहन साखरे, अल्पेश थुरपुडे, सत्यजीत देशमुख, सनी पाटील, विवेक पाटील, साहिल सुर्वे, वैशाली भोसले, जयश्री डोंगरे, माजी नगरसेविका, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते.

Exit mobile version