| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील महाविद्यालयात वाणिज्य दिन समारंभ व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वर्षभरात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांची माहिती विभाग प्रमुख डॉ.कल्याणी नाझरे यांनी दिली.
प्राचार्य हर्षल जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वरुप गाणेकर, शिल्पा बोराडे ,वैष्णवी मालुसरे,सलमान अन्सारी,दिवेकर, ललिता पालेकर व मोरे या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. या वेळी पोस्टर प्रेझेंटेशनही करण्यात आले. सूत्रसंचालन सलावा दळवी आणि मनिष साळगावकर यांनी केले. वाणिज्य शिक्षणातील भविष्यातील दिशा या संदर्भात प्रा.राजू गोरुले यांनी मार्गदर्शन केले.
सर्व प्राध्यापकेतर कर्मचारीही या कार्यक्रमास उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा.गोरुले यांनी केले. महाविद्यालय विकास समिती सदस्य शांतीलाल जैन,राजेंद्र भोसले व नितीन सुर्वे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय व तृतीय वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी केले. कु.सलवा दळवी व मनिष सायगावकर यांनी सूत्रसंचालन केले.






