| खोपोली | प्रतिनिधी |
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना ताणतणाव येऊ नये म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने जनता विद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करीत शुभेच्छा देण्यात आल्या. इयत्ता दहावीची परीक्षा गुरूवार दि.20 फेब्रुवारी रोजी सुरु झाली आहे. केटीएसपी मंडळाच्या जनता विद्यालयात बोर्ड आहे. याठिकाणी खोपोली शहरातील 5 ते 6 शाळांमधील 463 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा देताना ताणतणाव येऊ नये म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम,उपाध्यक्ष अबूबकर जळगांवकर,कार्यवाह किशोर पाटील, विस्तार अधिकारी शिल्पा दास, जनता विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य के.एम.गोरे,डॉ.प्रा.विकास सुर्यवंशी,उप प्रचार्य एस.डी.महावरकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने जनता विद्यालय परीक्षा केंद्रावर चांगल्या वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी बोर्डाच्या नियमानुसार व्यवस्था केली आहे.काँपीमुक्त अभियान राबवत सीसीटीव्ही लावण्यात आले. सर्व शिक्षक आणि पोलिस प्रशासनाचे सहकार्य करीत असल्याचे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगितले. केटीएसपी मंडळाच्या जनता विद्यालयात बोर्ड आहे.याठिकाणी खोपोली शहरातील 5 ते 6 शाळांमधील 463 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत
विद्यार्थ्यांना परीक्षा देताना ताणतणाव येऊ नये म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने व्यवस्था केली असल्याची माहिती जनता विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य के.एम.गोरे यांनी बोलताना दिली आहे.
