| पनवेल | वार्ताहर |
आर्थिक वादातून एका वेल्डर व्यवसाय करणार्याची हत्या केल्याची घटना पनवेल जवळील सुकापूर गावाच्या हद्दीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रियाजुद्दीन शेख (वय 58 वर्षे) असे त्यांचे नाव आहे. अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात हि हत्या झाल्याने या अज्ञात व्यक्तींना शोधण्याचे काम खांदेश्वर पोलिस करीत आहेत.