रायगडात ओला दुष्काळ

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

पेरणी केलेली रोपे पाण्यात, दुबार पेरणीही वाया

| अलिबाग | प्रमोद जाधव |

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु, सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतांममध्ये पाणी साचले होते. परिणामी, पेरणी केलेली रोपे पाण्याखाली गेली. एकदा केलेली पेरणी वाया गेल्याने दुबार पेरणी केली, परंतु तीसुद्धा वाया गेली. त्यामुळे भात लावणीसाठी रोपांचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन ओसाड राहण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे.

यावर्षी खरीप हंगामासाठी 81 हजार 335 हेक्टरवर भातपीक लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. त्यानुसार कृषी विभागाने कृषी सहाय्यकांच्या मदतीने प्रचार व प्रसारही केला. गावोगावी जाऊन भातलागवडीवर भर देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. भातलागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. परंतु, कृषी विभागाचे सर्व प्रयत्न आता वाया जाण्याची भीती आहे. कारण, भातपीक लागवडीचे उद्दिष्टच पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


दरवर्षी सात जूननंतर पाऊस सुरू होतो. त्यानुसार शेतकरी भात बियाणे खरेदी करण्यापासून पेरणीची तयार करतात. यंदा मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने सुरूवात केली. त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्याला पेरणीचा हंगाम साधता आला नाही. कारण, सातत्याने पाऊस पडतच राहिला. अशातच काही शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. परंतु, जमिनीची ऊब गेल्याने भाताची रोपे अर्ध्याहून अधिकच उगवली. काहींची शेतीमध्ये पाणी राहिल्याने बियाणे उगवलेच नाही. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थांबायला तयार नव्हता. त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचले. भात बियाणे पेरणी करण्याच्या शेतातील भागांमध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. दुबार पेरणी करूनही वाया गेल्याचे चित्र दिसून आले. पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे शेतांमधील पेरणी केलेली बियाणे वाहून गेली. उगवण झालेली रोपे कुजली, अशी परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा भातपिकाच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कृषी विभागाचे दुर्लक्ष
अवकाळी पावसासह गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाताची रोपे कुजली. पेरणी केलेले बियाणे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, जिल्हा कृषी विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट
भात बियाणांसह खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यात तीनशेहून अधिक कृषी सेवा केंद्र उभारण्यात आले. या सेवा केंद्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भात बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांनी बियाण्यांसह खते खरेदी केली. यावर्षी लवकरच बियाणे खरेदी करण्यात आली. मात्र, पेरणी केलेली बियाणे वाहून गेल्याबरोबरच उगवण झालेली रोपे कुजून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.


यंदा पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. रोपे कुजून गेली. दोन ते तीन वेळा पेरणी करूनही लावणीयोग्य रोपे झालेली नाहीत. त्यामुळे लावणीसाठी रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे. यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक जमीन ओसाड राहण्याची भीती आहे. भात उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे.

सतीश म्हात्रे,
शेतकरी

क्षेत्र कमी होण्याचा धोका वाढला
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. एक लाख 24 हजारांचे उत्पन्न असणारे भाताचे क्षेत्र आता 95 हजार 645 हेक्टरवर आले आहे. त्यामुळे 28 हजारांहून अधिक हेक्टर भाताचे क्षेत्र काही वर्षात कमी आहे. जिल्ह्यातील शेतीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. यावर्षी पावसाच्या खेळामुळे जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र कमी होण्याचा धोका वाढला असल्याचे दिसून येत आहे.
Exit mobile version