| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आसलपाडा येथील दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअरची मदत करण्यात आली.
आसल पाडा या गावातील दिव्यांग असलेल्या सरस्वती शेंडे यांना श्री साई ट्रस्टकडून व्हीलचेअर तर वामन शेंडे यांच्यासाठी ट्रायसिकल यांची मदत करण्यात आली. यावेळी श्री साई ट्रस्टच्या संचालिका राधिका घुले, माणगावतर्फे वरेडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले तसेच स्थानिक ग्रामस्थ संतोष शेंडे, हे उपस्थित होते. श्री साई ट्रस्टकडून शेंडे कुटुंबाच्या घरी जाऊन ही मदत वाटप करण्यात आली.







