कोळी मच्छीमार बांधवांची होतंय दमछाक
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड -एकदरा येथील कोळी मच्छीमार बांधवांना समुद्राकिनारी आपल्या मच्छीमारी बोटी लावताना दमछाक होत आहे. शहराच्या हक्केच्या अंतरावर एकदरा गाव असून, या गावाला व शहराला जोडून एकदरा खाडी आहे. या खाडी जवळ शेकडो कोळी मच्छीमार बांधव आपल्या बोटी किनाऱ्यांवर लावत असतात. सध्या खाडीत गाळ जास्त साठल्याने बोटी किनाऱ्यांवर आणताना बोटीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे मच्छीमार करणाऱ्या कोळी बांधव आपल्या बोटी समुद्राच्या किनाऱ्यांवर न आणता खोल समुद्राच्या पाण्यात आपल्या बोटी थांबवाव्या लागत आहेत. पुन्हा बोटीत जायचं असेल तर छोट्या बोटीचा आसरा घेऊन बोटीत जावे लागते. या दरम्यान बोटीतून मच्छी उतरते वेळी मच्छीचा नुकसान होत आहे.
गाळमुक्त मुरुड -एकदरा खाडी मुक्त कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. खाडीतील गाळ काढुन सदरची खाडी रुंद व खोलगट करावी. जेणेकरुन कोळी बांधवांच्या होड्या तिथे राहु शकतील. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने होड्या साकरल्या जाऊ शकतात. त्याबरोबर ग्रोयन्यस बंदराकरिता मत्स्य विभागाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर त्याची निर्मिती करून कोळी बांधवांना सहकार्य करावे. अशी मागणी यावेळी एकदरा- मुरुड कोळी मच्छीमार बांधवांनी केली आहे.






