मातीचा बंधारा गाळ मुक्त कधी?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील गावंडवाडी येथील मातीचा बंधारा अनेक वर्षे गाळ काढण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, जून महिना सुरू झाला तरी गाळ काढण्याची कामे लघु पाटबंधारे विभागाने सुरू केली नाहीत. दरम्यान, हा मातीचा दगड, माती तसेच, गाळाने भरलेला असल्याने तेथील नळपाणी योजना धोक्यात आल्या आहेत.

खांडस ग्रामपंचायतमध्ये गावंडवाडी आणि मोरेवाडी या आदिवासी वाडीमध्ये गावंडवाडी मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. त्या बंधाऱ्याच्या पाण्यावर स्थानिक आदिवासी लोक पिण्याच्या पाणी तसेच, भाजीपाला शेतीसाठी पाण्याचा वापर करायचे. मात्र, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मातीचा बंधारा बांधण्यात आला. गेली 30 वर्षे या मातीच्या बंधाऱ्यात साचलेली गाळ शासनाच्या यंत्रणेने काढला नसल्याने त्यातील नैसर्गिक झरे बंद झाले आहेत. त्याचवेळी या मातीचे बंधाऱ्यातील पाण्याचा पाझर हा गाळ, दगड येऊन भरला आहे. त्यामुळे पाण्याचा पाझर बंद झाल्याने पाण्याची भूजल क्षमतादेखील कमी झाली आहे. त्यामुळे मातीचा बंधाराच्या खाली असलेल्या सर्व विहिरी आटल्या आहेत.

Exit mobile version