। मुंबई । (दिलीप जाधव) ।
उरण तालुक्यातील मौजे धुतुम येथील दत्तू भिवा ठाकूर यांची सिडकोने जमिन घेऊन हि साडेबारा टक्के योजनेतील भूखंड अद्याप मिळाला नाही, तो कधी मिळणार असा सवाल शेकाप आ. जयंत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढला जाईल असं आश्वासन दिलं आहे.
धुतुम येथील दत्तू भिवा ठाकूर यांची सिडकोने 1984 साली जमिन संपादित केली . मात्र जमिनीच्या मोबदल्यात 12.5 टक्के योजनेतील भूखंड सिडकोने अद्याप न दिल्यामुळे ठाकूर यांनी सिडको कार्यालयाचत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होत नवघर येथील दत्तू भिवा ठाकूर व इतर शेतकर्यांची 2.87.3 हेक्टर आर इतकी जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित झालेली असून त्यापैकी क्षेत्र.1.16.0 हेक्टर आर क्षेत्र 12.5 टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी पात्र आहे . उर्वरित क्षेत्र 1.70.8 हेक्टर आर नियाज खातेशी संबंधीत असल्याने शासन निर्णय दिनांक 6.3.1990 व दिनांक 28.10.1994 मधील तरतुदीनुसार 12.5 टक्के योजनेअंतर्गत पात्र ठरत नाही . तसेच पात्र क्षेत्रासाठी 1000 चौ.मीटर चा भूखंड देय असून त्यांना द्रोणागिरी नोड येथे भूखंड क्रमांक 56 सेक्टर क्रं.59 क्षेत्र 300 चौ.मीटर भूखंडाचे वाटप पूर्ण करण्यात आले असून शिल्लख 700 चौ.मीटर ची भूखंड पात्रता संभाव्य सोडती मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. दिनांक 6.3.1990 व दिनांक 28.10.1994 मधील तरतुदीनुसार 12.5 टक्के योजनेअंतर्गत संबंधितांना भूखंड वाटपाची कार्यवाही सिडको कडून करण्यात येत असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.