इशानला संधी कधी देणार?

जडेजाने संघ व्यवस्थापनाला फटकारले


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला पहिल्या तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 2 अर्धशतके ठोकले. पण यानंतर इशानला दोन सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने किशनला विश्रांती देण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जडेजा म्हणाला की, किशनला सतत संधी दिली पाहिजे. टी-20 मालिकेतील अवघ्या 3 सामन्यांनंतर त्याला विश्रांती द्यावी लागली म्हणून किशन खरोखरच इतका थकला आहे का, असा सवाल त्यांनी केला.

अजय जडेजा पुढे म्हणाला की, तो त्याच्या दिवशी खेळ बदलू शकतो. पण तुम्ही त्याला कधी तयार करणार? त्याला नेहमी राखीव ठेवणार आहे का? गेल्या दोन वर्षांत त्याने किती सामने खेळले आहेत? भारतीय क्रिकेटची ही समस्या आताची नाही तर खूप जुनी आहे, की आपण खेळाडूला निवडत नाही तर त्यांना बाहेर करतो.

Exit mobile version