पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा भारतात कुठे पाहता येणार?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचे 33 वे पर्व पॅरिसमध्ये 25 जुलै ते 11 ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. भारतीयांना ऑलिम्पिक स्पर्धा स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमाने ऑलिम्पिक 2024 स्पर्धा फ्रीमध्ये दाखवण्याची घोषणा केली आहे. तसेच दूरदर्शवरील स्पोर्ट्स चॅनेलवरदेखील हे सामने पाहता येणार आहेत.

जगभरातील दहा हजाराहून अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. भारताच्या दलात 113 स्पर्धक सहभागी आहेत. तिरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, गोल्फ, हॉकी, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, रोव्हिंग, ज्युडो या खेळात भारतीय खेळाडू सहभागी आहे. भारताकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत जरीन यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत आहे.

स्पर्धेत हे खेळ नसणार
टोक्यो ऑलम्पिक 2020 स्पर्धेत समितीने कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल सहभागी केले होते. पण पॅरिस ऑलम्पिकमध्ये हे खेळ नसतील. ऑलंपिकमध्ये पहिल्यांदाच स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लायम्बिंग, सर्फिंग आणि ब्रेकिंग अपारंपरिक खेळांचा समावेश झाला आहे. ब्रेकिंगला डान्सिंग असं संबोधलं जातं. हा खेळ पहिल्यांदाच खेळला जाणार आहे. पॅरिसमध्ये यापूर्वी दोन ऑलंम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1900 आणि 1924 मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पॅरिस हा लंडन तिसर्‍यांदा यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी टोक्यो ऑलंम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एकूण 7 पदकं आली होती. या स्पर्धेत भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पाहता येणार?
भारतीयांना ऑलिम्पिक स्पर्धा स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अ‍ॅपवर ही स्पर्धा फ्रीमध्ये पाहू शकता. जिओ सिनेमाने ऑलम्पिक 2024 स्पर्धा फ्रीमध्ये दाखवण्याची घोषणा केली आहे. तसेच दूरदर्शवरील स्पोर्ट्स चॅनेलवरदेखील हे सामने पाहता येणार आहेत.
Exit mobile version