कुस्तीसाठी ‘आयओए’ नियुक्त हंगामी समिती निर्णय घेणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. सरकारच्या आदेशानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेली निवड चाचणी यासंदर्भात निर्णय घेणार आहे. सध्या ही समिती खुली निवड चाचणी घेण्याचा विचार करत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा या वर्षी 23 सप्टेंबरपासून होणार आहेत. त्यासाठी जूनच्या तिसर्या आठवड्यात कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अपेक्षित आहेत. या आठवड्यात या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमानुसार, गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा, राष्ट्रीय मानांकन, फेडरेशन चषक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंसह गुणवान कुमार कुस्तीगिरांना चाचणीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता बदलत्या चित्रानुसार हंगामी समिती सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा यांनी खुल्या निवड चाचणीची तयारी ठेवली आहे. यामध्ये महासंघाशी संलग्न सर्व राज्य संघटना आपल्या पसंतीचे मल्ल चाचणीसाठी पाठवू शकतील. अर्थात, यावर अजून निर्णय झालेला नाही. प्रशिक्षक आणि तज्ज्ञ पंचांच्या मते चाचणीसाठी वेळ कमी आहे आणि या कमी वेळेत खुली चाचणी पूर्ण होऊ शकणार नाही